‘ज्येष्ठ नागरिक’चा वर्धापनदिन उत्साहात

‘ज्येष्ठ नागरिक’चा वर्धापनदिन उत्साहात

ठाणे, ता. १६ : लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संस्थेचा १७ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रकाश दिघे यांनी केले. अजिता कुमठेकर यांच्या हस्ते मजल-दरमजल या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याच प्रमाणे २०२२-२३ वर्षाचा कार्य अहवाल देखील सादर करण्यात आला.
...................................
कादंबरी प्रकाशन
ठाणे : आम्ही सिद्ध लेखिका ठाणे शाखेतर्फे कादंबरी प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लेखिका शुभांगी गान यांनी लिहलेल्या थोरले बाजीराव, सम्राट समुद्रगुप्त या कादंबरींचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कवी महेश केळुस्कर, समीक्षक डॉ. अनंत देशमुख, सुप्रसिद्ध चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. हा प्रकाशन सोहळा सोमवार, २२ मे रोजी, दुपारी ४ वाजता, मराठी ग्रंथ संग्रहालय, १ ला मजला, वा.अ. रेगे सभागृह, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड येथे होणार आहे.
................................
व्यापारी मंच सभा
ठाणे : टीएमपीसी व्यापारी मंचातर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या वेळी विकास करंदीकर हे उपस्थितांना व्यवसायात ॲटोकॅडचा उपयोग कसा करावा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवार, १८ मे रोजी, ओएसिस सभागृह, मखमली तलाव, ठाणे(प.) येथे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com