नदी प्रदूषण रोखण्यासाठी टँकरवर बंदी

नदी प्रदूषण रोखण्यासाठी टँकरवर बंदी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : ठाणे जिल्ह्यातील अनेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत. एमआयडीसीमधील कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी हे प्रक्रिया न करता अनेकदा तसेच सोडले जाते. त्यातच रात्रीच्या वेळेस नाले, खाडी, नदीपात्रात टँकरमधून रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याची बाब उघड झाली आहे. हे नदीप्रदूषण रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळेस सर्व प्रकारच्या टँकरला बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे. १२ जुलैपर्यंत ही बंदी कायम करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथसह बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. याला आळा घालण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला रात्रीच्या वेळेस बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अजून ही कायम ठेवण्यात आली आहे. १४ मे पासून १२ जुलैपर्यंत संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे शहर विशेष शाखेकडून सांगण्यात आले आहे.
.....
औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या वेळेस टँकर वाहतुकीला बंदी आधीच घालण्यात आली आहे. त्या मनाई आदेशाची मुदतवाढ करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग कल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com