अखेर नालेसफाईचा मुहूर्त लागला

अखेर नालेसफाईचा मुहूर्त लागला

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामाचा मुहूर्त अखेर मिळाला आहे. मंगळवारपासून पोकलेन मशीनच्या सहाय्याने वालधुनी नदीसह मोठ्या नाल्यांची सफाई करण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात ८ मे रोजी ‘सकाळ’मध्ये ‘वालधुनी नदी कचऱ्याने तुडुंब’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.
शहरातील ४६ नाल्यांपैकी आठ मोठे नाले प्रभाग समिती तीनअंतर्गत असल्यामुळे ४६ नाल्यांपैकी ३८ मोठे/छोटे नाले व शहरातील अंदाजित ८८५ अंतर्गत नाले/गटारे/कल्व्हर्ट आहेत. आवश्यकतेनुसार पोकलेन व जेसीबी मशीनद्वारे लहान व मोठ्या नाल्यांची सफाई करणे तसेच मनुष्यबळाद्वारे सफाई करणे व निघालेला कचरा/गाळ यांची डम्परद्वारे वाहतूक डम्पिंग ग्राऊंडवर करणेबाबतची वार्षिक कामे ठेकेदारामार्फत करून घेण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे व एकनाथ पवार यांच्या पर्यवेक्षणाखाली उल्हासनगर रेल्वे स्थानक व चांदीबाई कॉलेजच्या समोरून वाहणाऱ्या वालधुनी नदीपासून मोठ्या नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, सार्वजनिक विभागाचे अधिकारी मनीष हिवरे व विनोद केणे, राष्ट्रवादीचे जमिल खान, शिवाजी रगडे, वालधुनी संवर्धन समितीचे शशिकांत दायमा यांच्या उपस्थितीत नालेसफाईचे उद्‍घाटन करण्यात आले.

-------------------
येत्या मान्सूनच्या पावसात अतिवृष्टी झाल्यास प्रशासन संभाव्य पूरपरिस्थितीच्या दृष्टीने सफाई केली जात आहे. नदी-नाल्यात कोणताही कचरा टाकून प्रवाहाला प्रतिबंध होईल, असे करू नये. १५ जूनपूर्वीच ही नालेसफाई होईल, असे नियोजन केले आहे. तसेच प्रशासनास अशी सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अजिज शेख, आयुक्त, उल्हासनगर पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com