Sun, Sept 24, 2023

संरक्षण भिंतीवर पडले नारळाचे झाड
संरक्षण भिंतीवर पडले नारळाचे झाड
Published on : 16 May 2023, 1:52 am
ठाणे, ता. १६ (वार्ताहर) : ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतीळ गोकुळधाम सोसायटीच्या आवारातील नारळाचे झाड संरक्षण भिंतीवर पडून इमारतीच्या शेडच्या पत्र्याचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड कापून बाजूला केले. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.