पाईपवरून घरात घुसत चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पाईपवरून घरात घुसत चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पाईपवरून घरात घुसत चोरी करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ‘स्पायडरमॅन’प्रमाणे इमारतीच्या पाईपवरून चढत खिडकीतून घरात प्रवेश करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरांना सांताक्रूझ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींची नावे राहुल सदाशिव मुदानी आणि सनी पवार अशी असून ते अंधेरी पश्चिमेच्या आझादनगर व डी. एन. नगर परिसरातील राहणारे आहेत. दोघे नालेसफाई आणि कचरा वेचण्याच्या बहाण्याने आधी रेकी करायचे आणि त्यानंतर त्या ठिकाणी चोरी करत असत.

सांताक्रूझ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ५ मेदरम्यान तक्रारदारांच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये अनोळखी व्यक्तींनी बिल्डिंग डक्टच्या पाईपवरून चढत घरातील बेडरूमच्या टॉयलेटमधील बंद खिडकीची काच तोडली. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाट, ड्रेसिंग टेबल, चांदीचे दागिने आणि काही वस्तूंसह दीड लाख रोख रक्कम घेऊन पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळाजवलील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची माहिती मिळवली. आरोपींची छायाचित्रे मिळताच त्यांचा माग काढत दोघांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com