मुख्यमंत्र्यांचा नेमका कोणता विजय झाला?

मुख्यमंत्र्यांचा नेमका कोणता विजय झाला?

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : न्यायालयाच्या निकालात शिंदे गटाचा व्हीप आणि गटनेतेपद बेकायदा ठरल्यानंतरही अर्धवट माहितीच्या आधारावर शिंदे गटाने ठाण्यात मोठा गाजावाजा करत मोठा विजय झाल्याचे बॅनर लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही जाहीर आव्हान देतो, त्यांनी त्यांचा नेमका काय विजय झाला आहे, हे ठाणेकर जनतेला आमच्यासमोर बसून सांगावे. मी त्यांना १०१ रुपये बक्षीस देऊन त्यांचा जाहीर सत्कार करेन, असे आव्हान ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी दिले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटाचा नैतिक पराभव झाला आहे. भाजपच्या विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार गेल्यानेच शिंदे गट खुश आहे. या प्रकरणावर आता भाजपचे विधानसभा अध्यक्ष निकाल देणार, याच्यातच शिंदे गट त्यांचा विजय मानत आहे. तांत्रिक मुद्द्यांवर सरकार वाचले असले, तरी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्यात शिंदे गटावर ताशेरे ओढले आहेत. शिंदे गटाचा व्हीप बेकायदा आहे. शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपदच बेकायदा आहे. म्हणजे ज्यांचा पायाच मुळात बेकायदेशीर आहे ते आपली इमारत अधिकृत असल्याचा खोटा प्रचार करत असल्याचा टोला घाडीगांवकर यांनी लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com