जिल्हा परिषदेचे नववी, दहावीचे वर्ग

जिल्हा परिषदेचे नववी, दहावीचे वर्ग

पालघर, ता. १६ (बातमीदार) : जिल्हा परिषदेचे या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत मंत्री चव्हाण यांनी संमती दिली आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा प्रश्न, नववी व दहावीच्या शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न व आरोग्य विभागात डॉक्टर व परिचारिका यांची भरती आदी विषयांवर ही बैठक पार पडली.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या अडचणी ऐकून घेतल्या. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषदेमधील अनेक विभागांमध्ये रिक्त पदांबाबतचा सविस्तर आढावा घेतला. शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न, शिक्षकांच्या मानधनासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या नववी व दहावीच्या वर्गांसाठी शिक्षकपदांना मान्यता, नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावित वर्गासाठी परवानगी, वित्त विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत शासन स्तरावरील प्रलंबित बाबी, आरोग्य विभागातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व २७ उपकेंद्र मंजुरीसाठी व निधी उपलब्धता, जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र पथके, जिल्हा परिषद दवाखाने यांचे दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी लागणारा निधी यांचा सविस्तर आढावा घेतला.

---------------
लवकरात लवकर अंमलबजावणी करा
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी नववी, दहावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, त्यांचा मुद्दा ठळकपणे सभागृहात मांडल्यावर पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजनमधून नवीन शासकीय नियमानुसार या वर्गासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. या वेळी अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा करून लोकहिताचे जे जे निर्णय असतील ते घेण्यात येऊन त्या अनुषंगाने लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देश या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com