Wed, October 4, 2023

बनावट एअर गनने धमकी देणारा अटकेत
बनावट एअर गनने धमकी देणारा अटकेत
Published on : 16 May 2023, 4:15 am
मुंबई, ता. १६ : वाहन उभे करण्यावरून झालेल्या वादात बनावट एअर गन दाखवून धमकावणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अँटॉप हिल पोलिसांनी सोमवारी (ता. १५) रात्री अटक केली. नितीन अरोरा असे अटक केलेल्याचे नाव आहे. नितीन एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतो. फिर्यादी दीपक यांनी दिलेल्या जबाबानुसार अरोरा आणि दीपक यांच्यात वाहन उभे कारण्यावरून भांडण झाले. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली होती. अरोराने आपल्यावर हल्ला केला आणि नंतर एअर गनने धमकावले, असा दावा दीपकने केला आहे. अरोरा एअर गन का वापरत होता आणि तो किती दिवसांपासून ती बाळगत होता याचा पोलिस तपास करीत आहेत.