ट्रकची रिक्षा, कारला धडक; वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रकची रिक्षा, कारला धडक; वाहतूक ठप्प
ट्रकची रिक्षा, कारला धडक; वाहतूक ठप्प

ट्रकची रिक्षा, कारला धडक; वाहतूक ठप्प

sakal_logo
By

शहापूर, ता. १६ (बातमीदार) : आयशर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा व कारला धडक दिल्याची घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव रेल्वे पुलाजवळ घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून ट्रक चालक व रिक्षा चालक किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रक चालकावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्ता दुभाजकावर चढून मुंबईकडे जाणाऱ्या एका रिक्षाला व कारला धडकला. या अपघातात रिक्षाचालक सुनील विशे व ट्रकचालक वृषभ कापसे किरकोळ जखमी झाले आहेत. कारमधील प्रवासी सुखरूप बचावले आहेत. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून शहापूर पोलिस तपास करत आहेत.