खोट्या तक्रारप्रकरणी संचालकांवर गुन्हा

खोट्या तक्रारप्रकरणी संचालकांवर गुन्हा

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : एपीएमसी मॅफ्को मार्केटमधील कंपनीतीलच संचालकाने कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून बनावट ई-मेलद्वारे एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीकडे खोट्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे संबंधित कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून संचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील अग्रवाल कुटुंबीयांनी २००१ मध्ये मॅफ्को मार्केट येथील परदेशात सी-फूड निर्यात करणारी आल्प्स आईस ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रा.लि. ही कंपनी ताब्यात घेतली होती. त्यानंतर वडील क्रिशन गोपाल अग्रवाल व त्यांची दोन्ही मुले विपुल अग्रवाल (५०) आणि कपिल अग्रवाल (४८) या कंपनीमध्ये संचालक झाले होते. गेल्या वर्षी वडील क्रिशन अग्रवाल आणि त्यांचा मोठा मुलगा विपुल अग्रवाल यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाले होते. त्यामुळे विपुल अग्रवाल याने आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे प्रयत्न सुरू केले होते. याच अनुषंगाने ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्प्स आईस ॲण्ड कोल्ड स्टोरेज या कंपनीविरोधात अनिल काटदार नावाच्या व्यक्तीने ई-मेलद्वारे मुंबईतील एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीकडे खोट्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीने कंपनीची ४० दिवसांत तपासणी केली होती. पण या प्रकारामुळे कंपनीचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com