ठाण्यात मनुष्यवधाच्या गुन्ह्यात घट

ठाण्यात मनुष्यवधाच्या गुन्ह्यात घट

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) : ठाणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत विविध कारणास्तव दाखल होणाऱ्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात २०२३ मध्ये घट झाली आहे. २०२० ते २०२३ या चार वर्षांत ठाण्यात सर्वाधिक मनुष्यवधाचे ३० गुन्हे हे २०२१ मध्ये दाखल झालेले आहेत. तर चालू वर्षात चार महिन्यांमध्ये केवळ तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्यातही पोलिसांना यश आले आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा अपघात, अपघाती निधन, सुरक्षा साहित्य न पुरवल्याने झालेल्या अपघातात मृत्यू पावणे, इमारतीवर काम करताना पडून कामगारांचा मृत्यू होणे अशा प्रकरणात कारणीभूत ठरणाऱ्या जबाबदार व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. एखाद्या गोष्टीला प्रत्यक्षात कारणीभूत किंवा घटनास्थळी कुठलाही सहभाग नसताना त्यांच्या आस्थापना किंवा व्यक्तीविरोधात अपघाती मृत्यूच्या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा गुन्ह्याची आकडेवारी कमी असली, तरीही या वर्षात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आणि त्यांची उकलही झाली आहे.
२०२१ या वर्षात अपघाती निधन, हलगर्जी, निष्काळजीपणा यामुळे अपघाती मृत्यू किंवा अन्य घटनेत मृत्यू झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून सर्वाधिक गुन्हे दाखल झालेले आहेत. २०२१ मध्ये तुलनेत विक्रमी नोंद आणि वाढ आहे. तब्बल ३० सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २९ गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर २०२२ मध्ये सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात कमालीची घट झाली आहे. २०२२ या वर्षांत सात गुन्हे दाखल आहेत. तर सहा गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.

=======================================
महिना २०२१ २०२२ २०२३
दाखल उकल दाखल उकल दाखल उकल
=======================================
जाने -- -- १ १ १ १
फेब्रुवारी १ १ -- -- १ १
मार्च २३ २२ १ -- -- --
एप्रिल -- -- २ २ १ १
मे -- -- -- -- -- --
जून ३ ३ -- -- -- --
जुलै -- -- -- -- -- --
ऑगस्ट -- -- -- -- -- --
सप्टेंबर १ १ २ २ -- --
ऑक्टोबर -- -- -- -- -- --
नोव्हेंबर -- -- -- -- -- --
डिसेंबर २ २ १ १ -- --
=======================================
एकूण ३० २९ ७ ६ ३ ३
=======================================

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com