ग्राहक मेळाव्यातून दीड लाखाची वसूली

ग्राहक मेळाव्यातून दीड लाखाची वसूली

खर्डी, ता. १७ (बातमीदार) : गेल्या काही वर्षांपासून वीज बिलाची थकबाकी असल्याने कायमस्वरूपी तोडलेली वीजजोडणी पूर्ववत करण्यासाठी खर्डी महावितरण कार्यालयात वीजग्राहकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात गोरगरिबांची थकलेल्या बिलासंदर्भात तडजोड करून त्यांचे बिल भरून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खर्डीतील १,२३५ ग्राहकांचे वीज बिल थकल्याने त्यांची वीज जोडणी कापण्यात आली होती. या मेळाव्यात ५५ ग्राहकांनी तडजोडीनंतर एक लाख ५० हजार रुपयांची थकबाकी भरून तात्काळ वीज जोडणी पूर्ववत करून घेतली. यापुढे वीज बिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांनी आपली थकबाकी तडजोड करून लवकरात लवकर भरून घ्यावी व आपला वीजपुरवठा सुरळीत सुरू करून घ्यावा, असे आवाहन खर्डीचे कनिष्ठ अभियंता एस. एम. राठोड यांनी केले असून वीज बिल न भरता परस्पर वीज जोडणी करून घेणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शहापूरचे अभियंता अविनाश कट्टकवार, अर्चना ढोले यांच्यासह खर्डी महावितरणचे कर्मचारी आणि दोनशे ग्राहक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com