‘माणेरे, आशेळेतील पाणी समस्या सोडवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माणेरे, आशेळेतील पाणी समस्या सोडवा’
‘माणेरे, आशेळेतील पाणी समस्या सोडवा’

‘माणेरे, आशेळेतील पाणी समस्या सोडवा’

sakal_logo
By

कल्याण, ता. १७ (बातमीदार) : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या माणेरे, आशेळे परिसरातील पाणी समस्या लवकरात लवकर सोडवा, अशी सूचना आमदार गणपत गायकवाड यांनी अधिकारी वर्गाला दिली. माणेरे, आशेळे येथील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मुख्य जलवाहिनीवरून नळजोडण्या बेकायदा बांधकामांना दिल्या असल्याने गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संतप्त नागरिकांनी नुकतेच रास्ता रोको आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता (आय) शैलेश मळेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन गायकवाड यांनी चर्चा केली. यावेळी आगामी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश आमदार गणपत गायकवाड यांनी दिले.