भिवंडीत गावठाण जागेचा प्रश्न ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत गावठाण जागेचा प्रश्न ऐरणीवर
भिवंडीत गावठाण जागेचा प्रश्न ऐरणीवर

भिवंडीत गावठाण जागेचा प्रश्न ऐरणीवर

sakal_logo
By

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात शासनाने नवनवीन विकासाचे प्रकल्प होऊ घातले असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून काही बेघर झाले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी गुरुचरणीवरील उरलेल्या जागेला गावठाण म्हणून जाहीर करावी, अशी मागणी सुरू केली आहे.
तालुक्यातील दापोडे आणि परिसरातील गावातील भूमिपुत्रांनी दापोडे सर्वे नंबर ११५ व मानकोली गुरचरण, वेहेळे, वळ, गुंदवली या सर्व गावांतील जमिनी गावठाण करण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. तसेच माणकोली मोठागाव डोंबिवली या मार्गाला हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जय आगरी सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दापोडे सर्वे नंबर ११५ व माणकोली गुरचरण जागा, वेहेळे, वळ, गुंदवली या सर्व ग्रामपंचायत गावातील जमिनी गावठाण करण्यासाठी सर्व भूमिपुत्रांनी मागणी केली आहे, याबाबतचे सर्व पुरावे ग्रामस्थांकडे आहेत. शासन नियमानुसार सदर गुरुचरण जागा ही प्रत्येक दहा वर्षांत दहा टक्के गावठाण केली जाते, इथे मात्र स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून गेली तरीदेखील आमच्या एकाही गावांमध्ये गावठाण जागा केलेली नाही. नवीन रस्त्याला कोणत्याही प्रकारे विरोध नाही; मात्र स्थानिक भूमिपुत्रांना घरे बांधायला पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने गावाच्या भविष्यासाठी व बेघरांना घरे बांधण्यासाठी पर्यायी जागा असणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी अडवलेली जागा जरी रस्त्याला घेतली, तरी उर्वरित जागा आम्हाला गावठाण म्हणून शासनाने घोषित केल्यास भविष्यात ग्रामस्थांना घरे बांधण्यास अडचण निर्माण होणार नाही, असे जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी सांगितले. या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचे जाहीर केल्यानंतर घटनास्थळी पोलिसांच्या मध्यस्थीने शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन परिस्थीतीची पाहणी करीत अहवाल शासनास देणार असल्याचे सांगितले.