मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला

मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला

अंधेरी, ता. १७ (बातमीदार) ः मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील सुमारे पाच लाख नव्वद हजारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्‍या चार जणांच्या एका टोळीला दहिसर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. सुरेश शामराव पवार, अख्तर मुस्ताक कुरेशी, एजाज शमशुद्दीन खान आणि मीत महेशभाई जानी अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील स्‍थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
अकतरी सलीम बेगम ही ६२ वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या दोन मुलांसोबत दहिसरच्या प्रगतीनगरात राहते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिचे पती सलीम यांचे निधन झाले होते. त्यांचे एका खासगी बँकेत बचत खाते होते. त्यात त्यांनी काही रकम बचत करून ठेवली होती. ही रकम मिळावी यासाठी तिने बॅंकेत पत्रव्यवहार करून पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र सादर केले होते. या वेळी बँकेने त्यांना प्रतिज्ञापत्रासह उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. याच दरम्यान त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून काही एनईएफटी व्यवहार झाले होते. या व्यवहारातून त्यांच्या खात्यातून अन्य एका बँक खात्यात ५ लाख ८९ रुपये ट्रान्स्फर झाले होते. याबाबत बँक मॅनेजरने त्यांच्याकडे विचारणा केली होती. या वेळी त्यांनी असा कुठलाही व्यवहार केला नसल्याचे सांगितले. बँकेत गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने बोगस एनईएफटी स्लिप भरून ही रक्कम काढून घेतली होती. हा प्रकार उघडकीस येताच अकतरी बेगम यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू करत ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती, त्या बँक खातेदारांची माहिती काढण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सुरेश पवारसह अख्तर कुरेशी, एजाज खान आणि मीत जानी या चौघांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com