स्पर्धा परीक्षेसाठी सी. डी. देशमुख संस्थेचा लाभ घ्या : जगताप

स्पर्धा परीक्षेसाठी सी. डी. देशमुख संस्थेचा लाभ घ्या : जगताप

ठाणे, ता. १६ : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करताना ठाण्यातील सामाजिक संस्थांनी भरविलेल्या नोकरी मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. मेळाव्याचे उद्‌घाटन सी. डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले. त्यांनी एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी ठाणे महापालिकेच्या सी. डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेतील साडेसात हजार पुस्तकांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मावळी मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. संभाजी महाराजांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी करण्यासाठी मराठा जागृती मंच पानिपत (ठाणे), झेप प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, मराठा सामाजिक प्रतिष्ठान कळवा, नवयुग मित्र मंडळ, क्षत्रिय धार पवार चॅरिटेबल संस्था, मराठा उद्योजक लॉबी, मावळा प्रतिष्ठान, मातोश्री प्रतिष्ठान, छावा ढोल ताशा प्रथक आणि दि ग्रेट जावळी महाबळेश्वर प्रतिष्ठान या संस्थांनी मिळून नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये विविध १२ कंपन्यांनी सहभाग घेऊन तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे महादेव जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com