मेंदीतून रंगला आर्थिक सुबत्तेचा रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंदीतून रंगला आर्थिक सुबत्तेचा रंग
मेंदीतून रंगला आर्थिक सुबत्तेचा रंग

मेंदीतून रंगला आर्थिक सुबत्तेचा रंग

sakal_logo
By

गायत्री ठाकूर, डोंबिवली
भारतात लग्नसमारंभ म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. कारण भारतीय संस्कृतीत लग्नाच्या प्रथा हजारो वर्षांपासून यशस्वीपणे पाळल्या जात आहेत. त्यातच लग्नसोहळ्यांस विविध पारंपरिक मंगल कार्यासाठी मेहंदीला महत्त्वाचे स्थान आहे, पण याच मेंदीतून अनेकांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्तेचा रंग रंगला आहे.
भारतातील कोणतेही लग्न हे मेहंदी लावल्याशिवाय होत नाही. कारण मेहंदीविना नवरीचा शृंगार अपूर्ण मानला जातो. त्यामुळे भारतीय लग्नात मेहंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपली मेहंदी सर्वात आकर्षक दिसावी, सर्वात जास्त रंगावी असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पूर्वी मेहंदीचे चार ते पाच प्रकार उपलब्ध होते; परंतु आज अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यापैकी भारतीय मेहंदी डिझाईन, अरबी मेहंदी डिझाईन, पाकिस्तानी मेहंदी डिझाईन, हिन्दू-अरबी मेहंदी डिझाईन, मोरक्कन मेहंदी डिझाईन, मुगलई मेहंदी डिझाईन, असे विविध डिझाईन्स आहेत.
सध्याच्या लग्न सराईत मेहंदी काढण्यासाठी हा विशेष एक कार्यक्रम ठेवला जातो आणि या कार्यक्रमामध्ये नवऱ्या मुलीबरोबर जेवढे पाहुणे असतील तेवढ्यांच्या हातावर मेहंदी काढली जाते. त्यामुळे मेहंदी काढणाऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लाभत आहे. तसेच मेहंदीचा आकार, त्यातील नक्षीदार काम आणि लागणारा वेळ यावरून पैसे आकारले जात आहेत, असे वैशाली शिंदे यांनी सांगितले.
पूर्वी मेहंदी आर्टिस्ट उपलब्ध नव्हते, त्यामुळे साधी सोप्पी मेहंदी काढली जायची; परंतु आता मेहंदी आर्टिस्ट उपलब्ध असल्याने नवऱ्या मुलीबरोबरच महिला वर्गालासुद्धा आपल्या पसंतीनुसार मेहंदी काढतात, असे शिंदे यांनी सांगितले.
.....
आकर्षक मेहंदीची क्रेझ
सध्याच्या लग्नसराईत नववधू मेहंदी डिझाईन क्रिस क्रॉस वान्स मेहंदी डिझाईन, फुलांचा मंडला वेडिंग मेहंदी, कमळासह दुल्हन मेहंदी डिझाईन, वधू मेहंदी डिझाईन विथ बर्ड स्टोरी, नववधूंसाठी ज्वेलरी मेहंदी डिझाईन, वर-वधू मेहंदी डिझाईन, नवऱ्या मुलीचा भाऊ तिला घेऊन मंडपात जात आहे, अशा विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनची क्रेझ आहे.

हत्ती, ढोल-ताशे आणि मोराचेही डिझाईन
लोटस ब्राईडल मेहंदी डिझाईन, हत्ती, ढोल-ताशे, मोर मेहंदी डिझाईन, वधू आणि वर यांच्या शहराचे वर्णन करणारे मेहंदी डिझाईन, मिरर वधू मेहंदी डिझाईन, विवाह स्टोरी मेहंदी डिझाईन, रंगीत वेडिंग मेहंदी डिझाईन, डिज्नी वधू मेहंदी, लग्नाच्या रितीरिवाज कथाकथन वधू मेहंदी डिझाईन प्रकारचे डिझाईनला सध्या नववधू पसंती देत असून सध्या मेहंदीचे हे प्रकार मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. या डिझाईनची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते.
.....
काही मेहंदीमध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. आम्ही घरीच मेहंदी तयार करतो. ही मेहंदी ऑरगॅनिक असते. त्यामुळे वधूच्या त्वचेला नुकसान होत नाही. आम्ही जी मेहंदी काढतो त्याच्यामध्ये खूप बारीक कोरीव काम असते. त्यामुळे मेहंदी काढायला पाच ते सहा तास लागतात.
- सिमरन मेहरा, मेहंदी आर्टिस्ट