जागतिक संग्रहालय प्रदर्शन आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक संग्रहालय प्रदर्शन आजपासून
जागतिक संग्रहालय प्रदर्शन आजपासून

जागतिक संग्रहालय प्रदर्शन आजपासून

sakal_logo
By

मुंबई ता. १७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जागतिक संग्रहालय’ दिवसाचे औचित्य साधत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने १८ ते २० मे दरम्यान जागतिक संग्रहालय प्रदर्शन २०२३ चे आयोजन केले आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे हे प्रदर्शन होणार आहे. ‘द इंटरनॅशनल कौन्सिल ऑन म्युझियम्स’नुसार आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची यंदाच्या वर्षीची थीम ‘म्युझियम्स, सस्टेनेबिलिटी अँड वेल बीइंग’ ही ठरविण्यात आली आहे. या प्रदर्शनात ‘दुर्मिळ पुस्तकांचे जतन आणि संवर्धन’ या विषयावर एशियाटिक सोसायटीचे पेपर कॉन्झर्व्हेटर सुनील भिरूड यांचेही मार्गदर्शनपर सत्र होणार आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाच्या समारोप दिनी २० मे रोजी ते उपस्थितांना दुर्मिळ पुस्तकांचे जतन कसे करावे, या विषयी मार्गदर्शन करतील.