माणकेश्वर समुद्रकिनारी मृत डॉल्फिन

माणकेश्वर समुद्रकिनारी मृत डॉल्फिन

उरण, ता. १७ ः उरणच्या माणकेश्वर समुद्रकिनारी सात ते आठ फुटांचा डॉल्फिन मासा अनेक दिवसांपासून मृत अवस्थेत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिक प्रशासनासह वन विभागाला याची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मोरा-मुंबई प्रवास करताना जेएनपीटी परिसरात अनेक वेळा डॉल्फिन माशांचे दर्शन होते. खोल समुद्रात लाटांसोबत डॉल्फिनचा विहार नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेला आहे. पण मोठ्या जहाजांमुळे अनेक वेळा हे मासे मृत अवस्थेत किनाऱ्यांवर सापडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून माणकेश्वर स्मशानभूमीच्या पश्चिमेला खारफुटीत सात ते आठ फुटांचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत पडलेला आहे. मात्र, याकडे स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने दुर्लक्ष केल्याने पसरलेल्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
--------------------------------------------
दशक्रिया करण्यासाठी माणकेश्वरला गेलो होतो. त्यावेळी दुर्गंधी येत असल्याने पाहण्यासाठी गेलो असता खारफुटीमध्ये सात ते आठ फुटांचा डॉल्फिन मासा दिसला. बऱ्याच दिवसांपासून हा मासा येथे मृतावस्थेत असल्याचे दिसत आहे.
- रूपेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com