पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी आवाहन

मुंबई, ता. १७ ः राज्यात महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना गौरवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी महिला व बालविकास विभागाने अर्ज मागवले आहेत. समाजसेवा करण्यासाठी झटणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, हा या पुरस्कारांचा हेतू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येकी दोन महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येईल. या क्षेत्रात कार्य केलेल्या महिलांनी आपल्या कामाच्या तपशिलासह ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मे असून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी हे पुरस्कार दिले जातील, असेही लोढा यांनी सांगितले.
बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यांसारख्या क्षेत्रात काम केलेल्या महिलांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येतील, असेही लोढा म्हणाले. ग्रामपंचायत स्तरावर पुरस्कारांसाठी दोन महिलांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येत आहे. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाने नऊ मे रोजी शासन निर्णय काढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com