विक्रमगडमध्ये शॉर्ट फिल्मवर कार्यशाळेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये शॉर्ट फिल्मवर कार्यशाळेचे आयोजन
विक्रमगडमध्ये शॉर्ट फिल्मवर कार्यशाळेचे आयोजन

विक्रमगडमध्ये शॉर्ट फिल्मवर कार्यशाळेचे आयोजन

sakal_logo
By

विक्रमगड (बातमीदार) : विक्रमगड हायस्कूलमध्ये २८ मे रोजी संस्कार भारती, जनजाती विकास मंच, इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब फाळके चित्रपट कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रातील संबंधित कार्यशाळेचे प्रथमच आयोजन या परिसरात करण्यात येत आहे. या कार्यशाळेत संघटनेचे जनरल सेक्रेटरी आणि सेन्सर बोर्ड सदस्य संजय वर्मा, चित्रपट संगीत संयोजक आणि दिग्दर्शक संजय वारंग, अभिनेता अरुण शेखर आदि मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचे निमंत्रक संस्कार भारतीचे पालघर विभाग प्रमुख सुरेंद्र कुळकर्णी आणि संयोजक अॅड. दिलीप जैन यांनी कार्यशाळेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी शार्ट फिल्म बनवणाऱ्या कलाकारांनी भाग घेऊन कलाकौशल्याची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन केले आहे.