ऑनलाईन कामाच्या प्रलोभनाने ८.६८ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन कामाच्या प्रलोभनाने ८.६८ लाखांचा गंडा
ऑनलाईन कामाच्या प्रलोभनाने ८.६८ लाखांचा गंडा

ऑनलाईन कामाच्या प्रलोभनाने ८.६८ लाखांचा गंडा

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) ः ठाण्यातील कासारवडवली येथे आभिष शिवशंकर दुबे या (२८) तरुणाला ऑनलाईन कामाच्या माध्यमातून अधिक पैसे देण्याचे आश्वासन देत त्याची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली. या घटनेत अनोळखी व्यक्तीने आभिष दुबे याची ८ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला. ठाण्यातील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या आभिषला काही अज्ञात व्यक्तींनी आॅनलाईन संपर्क साधला. त्यानंतर ऑनलाईन कामाचे अधिक पैसे मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. या वेळी त्या अज्ञात आरोपीने २० एप्रिल ते ६ मे यादरम्यान आभिषची एकूण ८ लाख ६८ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. कासारवडवली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.