१७ व्या माळ्यावरून उडी घेत २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

१७ व्या माळ्यावरून उडी घेत २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) ः ठाण्याच्या चितळसर मानपाडा परिसरातील सिद्धांचल इमारतीच्या १७ व्या माळ्यावरून उडी घेऊन २७ वर्षीय ध्रुव चंद्रन या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद चितळसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. चितळसर परिसरातील सिद्धांचल फेस-८ मधील इमारत क्रमांक ४ या इमारतीच्या १७ व्या माळ्यावरून त्याने उडी घेतली. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक निधनाची नोंद केली असून ते अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com