कलाध्यापक संघाचा पुरस्कार वितरण सोहळा

कलाध्यापक संघाचा पुरस्कार वितरण सोहळा

कलाध्यापक संघाचा पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, ता. १८ ः महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाशी संलग्‍न असलेल्‍या बृहन्मुंबई कलाध्यापक संघाच्या जिल्हास्‍तरीय कलाहर्ष व बाल चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच शिक्षकांना देण्यात येणारा आदर्श कलातपस्‍वी पुरस्‍कार वितरण सोहळा नुकताच झाला. या स्‍पर्धेत सहप्रायोजक म्‍हणून ‘सकाळ माध्यम समूह’, कीर्ती ॲनिमेशन कंपनी, कॅम्‍लिन कोकियो कंपनी यांनी सहभाग घेतला होता.
२०१८-१९ मध्ये पार पडलेल्‍या या स्‍पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा करोना काळ तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा, त्‍यांचा निकाल यामुळे लांबणीवर पडला होता. मात्र अखेरीस हा सोहळा पार पडला आहे. या वेळी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्‍ह्यांतील ३० ते ३२ शाळा सहभागी झाल्‍या व अंदाजे दोन ते तीन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. शालेय स्तरावर सहभाग प्रमाणपत्र सर्वांना देण्यात आली होती. या वेळी अ गटात २१, ब गटात २७, क गटात ४८ व ड गटात १६ विद्यार्थ्‍यांची निवड केली. तसेच १६ कलाशिक्षक ८ मुख्याध्यापक तसेच मुंबईतील पश्चिम, दक्षिण, उत्तर शिक्षण निरीक्षक विभागातील शाळेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३० शिक्षकांना आदर्श कला तपस्वी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच बाल चित्रकला स्पर्धेतील ३४ विद्यार्थी १९ शाळा १० कलाशिक्षक पाच मुख्याध्यापक यांना संघाच्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गौरवचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मुंबई दक्षिण शिक्षण विभागाचे शिक्षण निरीक्षक देविदास महाजन यांचे सहकारी बी. टी. पाटील, कलासंचालक राजीव मिश्रा यांचे सहकारी कलानिरिक्षक संदीप डोंगरे, परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे, एनकेईएस शाळेच्या मुख्याध्यापिका उमा महेश्वरी, एनकेईएसचे कमेटी मेंबर अनंत बनवासी, पद्मजा बनवासी, श्री सनातन धर्म हायस्कूल, सायनच्या प्राचार्या मंजू माडम, अध्यक्ष हिरामण पाटील, सचिव विरेंद्र सोनवणे, रामेश्वर विद्यालयाचे कलाशिक्षक कलमकर, एनकेईएसचे श्री शिवयोगी, आंध्रा स्‍कूलचे सप्पगल्लू यांच्यासह संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्‍थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हिरामण पाटील यांनी केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष विद्यामंदिर, मालाड शाळेचे संजय पाटोळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com