केबल चालकांना पालिकेचा दणका

केबल चालकांना पालिकेचा दणका

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : नवी मुंबई शहरात केबल व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी विद्युत खांबावरून वाट्टेल तशा पद्धतीने केबल टाकलेल्या आहेत. त्यामुळे शहरात केबलचे जाळे निर्माण झाले असून अनेकदा दुर्घटनादेखील घडल्या आहेत. शिवाय या केबलमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाने केबल जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महापालिका नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये राज्यात प्रथम व देशात तृतीय क्रमांकाचा स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महापालिकेने प्राप्त केला आहे. तसेच कचरामुक्त शहराच्या श्रेणीत नवी मुंबईने फाईव्ह स्टार रँकिंग प्राप्त केले आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्यीकरण करताना केवळ काही चौक आणि मुख्य जागा यापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण शहर सुशोभित करण्यावर नवी मुंबई महापालिकेने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शहराच्या सुशोभीकरणास बाधा ठरणाऱ्या टीव्ही केबल तसेच इंटरनेटसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल तोडण्याची कारवाई केली जात आहे.
--------------------------
पालिकेच्या मुदतीकडे दुर्लक्ष
केबल पुरवणाऱ्या एजन्सींनादेखील महापालिकेने पंधरा दिवसांची मुदत दिली होती; मात्र, टीव्ही केबल चालक व इंटरनेट केबल पुरवणाऱ्या एजन्सीकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मंगळवार (ता. १५) पासून महापालिकेच्या विद्युत विभागाने केबलचे जाळे कापण्यास सुरुवात केली आहे. ऐरोलीत महापालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एक टेम्पो भरून केबल जप्त केल्या आहे.
------------------------------------------
अनेकदा अपघातांचे प्रकार
नवी मुंबई शहरातील विद्युत खांबावर, इमारतीवर चौकामध्ये विनापरवानगी टीव्ही केबल, इंटरनेट केबल, त्याचप्रमाणे टेलिफोन केबल बेशिस्तपणे टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्युत खांबांना केबलचा विळखा पडला असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकारही घडले आहेत.
----------------------------------------
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिवाबत्ती खांबावरून विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकण्यात आल्याने दुर्घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे या केबल्समुळे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोहचत आहे.
- शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता, विद्युत विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com