बेकायदा बांधकामांवरून व्यापारी रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा बांधकामांवरून व्यापारी रडारवर
बेकायदा बांधकामांवरून व्यापारी रडारवर

बेकायदा बांधकामांवरून व्यापारी रडारवर

sakal_logo
By

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : पावसाळ्यापूर्वी वाशीतील बाजार समितीच्या आवारातील गाळ्यांची डागडुजी केली जाते. मात्र या डागडुजीच्या नावाखाली काही व्यापारी बेकायदा बांधकाम करतात. त्यामुळे गाळ्यांची डागडुजी करण्यापूर्वी संबंधित व्यापाऱ्याला बाजार समितीची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच दहा किंवा पंचवीस हजारांची अनामत रक्कमही भरावी लागणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
बाजाराच्या आवारात अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे बांधण्यात आली आहेत. अनेकांनी गाळ्यांच्या वर कार्यालये उभारली आहेत; तर काहींनी गाळ्यांच्या वर दोन मजली बांधकाम केले आहे. या बांधकामांचे पावसाळ्यात डागडुजी केली जाते. मात्र, डागडुजीच्या नावावर काही गाळाधारक बेकायदा बांधकाम करत असल्यामुळे अशा बांधकामांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाजारातील गाळ्यांची डागडुजी करण्यासाठी गाळाधारकाला परवानगीसाठी लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज आल्यावर बाजार समितीचे अभियंता प्रस्तावित कामाची पाहणी करणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर दुरुस्तीची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच किरकोळ डागडुजीसाठी दहा हजार; तर काही तोडफोड असल्यास पंचवीस हजारांची अनामत रक्कमही गाळाधारकाला भरावी लागणार आहे; पण आधीच बांधकामाचा खर्च त्यात अनामत रक्कम आकारण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांमधून या निर्णयाविरोधात नाराजी आहे.
---------------------------------------
व्यापाऱ्यांनी बेकायदा बांधकाम करू नये, यासाठी ही रक्कम आकारण्यात येणार आहे. तसेच दिलेल्या परवानगी दिलेल्या कामाशिवाय अन्य बांधकाम केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
- संगीता अधांगळे, उपसचिव, फळ बाजार