देखभालीअभावी सीएनजी वाहनांना आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देखभालीअभावी सीएनजी वाहनांना आग
देखभालीअभावी सीएनजी वाहनांना आग

देखभालीअभावी सीएनजी वाहनांना आग

sakal_logo
By

कासा, ता. १८ (बातमीदार) : पारंपरिक इंधनाचे भाव वाढत असल्याने अनेक वाहनचालक सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना पसंती देत आहेत. दोनच दिवसांपूर्वी वापी येथील सीएनजी भरताना कारमध्ये स्फोट झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान होऊन आजूबाजूच्या दोन गाड्यासुद्धा अपघातग्रस्त झाल्या. नशीब बलत्तर म्हणून कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. त्यामुळे सीएनजी गॅसधारक वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सीएनजी वाहनाची नियमित देखभाल न ठेवल्यामुळे अनेक वेळा आगी लागून मोठे नुकसान होते. सीएनजी वाहनाची नेहमी देखभाल ठेवली पाहिजे. नेहमी स्पार्क प्लगची स्वच्छता केली पाहिजे. कारण सीएनजी खूपच ज्वलनशील असल्यामुळे छोट्याशा जागेत गळती झाल्यास मोठी हानी होऊ शकते. सीएनजी वाहनामध्ये ज्वलनशील वस्तू वापरू नये. सध्या अनेक वाहनचालक जुनी वाहने विकत घेऊन त्यात बाहेरून सीएनजी किट बसवतात. त्यात अनेक त्रुटी राहू शकतात. अनेक केंद्रांवर सीएनजी भरण्यासाठी मोठी गर्दी होते. अशावेळी वाहनाला आग लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे सीएनजीधारक वाहनचालकांनी वाहनांची नियमित काळजी घ्यावी, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सीएनजी केंद्रावर मोठी गर्दी होते. अनेक वेळा धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागतो. अनेक सीएनजी चालकांना वाहनाविषयी माहिती नसल्याने जुन्या वाहनामध्ये सीएनजी किट बसवून अनेक वाहने चालतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
- रामनाथ पाटील, वाहनचालक