कचरा संकलनासाठी त्रिसुत्रीवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा संकलनासाठी त्रिसुत्रीवर भर
कचरा संकलनासाठी त्रिसुत्रीवर भर

कचरा संकलनासाठी त्रिसुत्रीवर भर

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २० ः केंद्र सरकारच्या २१ दिवस ‘थ्री आर’ चॅलेंजमध्ये नवी मुंबई महापालिका सहभागी होणार आहे. १५ मे ते ५ जून या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात महापालिका सज्ज झाली आहे. याअंतर्गत कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर तसेच पुनर्प्रक्रियेअंतर्गत शहरामध्ये ‘थ्री आर’ सेंटर्स सुरू करून स्वच्छ नवी मुंबईच्या पालिकेच्या प्रयत्नांना बळ दिले जाणार आहे.
-------------------------------------------
नवी मुंबई महापालिकेने ‘थ्री आर’ सेंटर्स ही संकल्पना शहरातील विविध विभागांत ९२ ठिकाणी राबवली आहे. या संकल्पनेंतर्गत ‘नको असेल ते द्या व हवे असेल ते घ्या’ वर आधारित सेंटर्संना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या सेंटर्सच्या कार्यप्रणालीमध्ये असलेल्या काही त्रुटी दूर करून आता नव्याने अधिक सक्षम अशी सुविधा देण्यावर पालिका भर देणार आहे. यासाठीच ‘थ्री आर’ चे महत्त्व नव्या पिढीत अर्थात विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी नवी मुंबई महापालिका ‘ड्राय वेस्ट बँक’ सारखा अभिनव उपक्रम शाळांमध्ये राबवत आहे. सध्या बेलापूर विभागातील ६ शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमास विद्यार्थी, तसेच पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील काळात सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा पालिकेचा मानस आहे.
-----------------------------------
नवनवीन उपक्रम सुरू
बिसलेरी कंपनीसोबत ‘बॉटल फॉर चेंज’ हा अभिनव उपक्रम, ‘एच ॲण्ड एम’ व काही इतर इंटरनॅशनल ब्रँडसोबत जुने कपडे घेऊन ग्राहकांना नवीन कपडे खरेदी करताना किमतीवर सवलतीच्या रूपात पॉईंट्स देण्याची अभिनव संकल्पना नवी मुंबईत यशस्वीपणे राबवली जात आहे. झोपडपट्ट्यांमधील कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावणारा ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे.
----------------------------------