बॅडमिंटनमध्ये वेलोसिटी संघाला विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅडमिंटनमध्ये वेलोसिटी संघाला विजेतेपद
बॅडमिंटनमध्ये वेलोसिटी संघाला विजेतेपद

बॅडमिंटनमध्ये वेलोसिटी संघाला विजेतेपद

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ : ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीमध्ये यंदाच्याही वर्षी भव्य उन्हाळी बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. दोनशेपेक्षा अधिक युवा खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या या शिबिराचे दोन वर्ग भरवण्यात आले. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या विविध राज्यांमधून या शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेलोसिटी संघाने या स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला.
बॅडमिंटनची विशेष स्पर्धा लीग फॉरमॅटमध्ये खेळण्यात आली. ज्यामध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते. प्रशिक्षक वेदांत जवंजाळ यांचा संघ वेलोसिटीने पहिल्या सामन्यापासून अतिशय उत्तम प्लॅनिंग करून प्रभुत्व जमवण्यास सुरुवात केली. अखेरपर्यंत या संघाचेच वर्चस्व राहिले. त्यांनी अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. या स्पर्धेत प्रशिक्षक अक्षय राऊत यांनी किंग स्मॅशर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली. या स्पर्धेत टीम स्मॅशर्स संघाचे प्रतिनिधित्व केले फुलचंद पासी यांनी, तर सत्यम कुमार यांनी टीम कोर्ट डॉमिनेटर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. प्रशिक्षक नरेंद्र वर्मा यांची सिझलिंग स्मॅशर्स टीम आणि दीपक मेस्त्री यांची स्मॅशिंग टायगर्स टीम यांनी ब्राँझपदक पटकावले.
........
यज्ञ्नेश, स्पृहा सर्वोत्तम खेळाडू
या स्पर्धेत अनेक रोमहर्षक सामने पहावयास मिळाले. तसेच अनेक उदयोन्मुख खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून सर्वांनाच अवाक केले. यात सर्वात चमकदार कामगिरी करणारा ठरला तो म्हणजे १० वर्षीय यज्ञ्नेश वारघडे. मुलींच्या गटात स्पृहा रहाळकर हिने बाजी मारली. दोघांना प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट म्हणजेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. खेळाडूंच्या पालकांनी सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले आणि कौतुक केले. अनेकांनी उन्हाळी शिबिराच्या पुढील सत्रासाठी नोंदणी देखील केली. ठाणे अकादमीचे सर्वेसर्वा श्रीकांत वाड यांनी सूत्रसंचालन केले.
.........
बॅडमिंटन प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्या खेळाडूंसोबत श्रीकांत वाड.