नालेसफाईवरुन अधिकारी-कंत्राटरांची झाडाझडती

नालेसफाईवरुन अधिकारी-कंत्राटरांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ः नाले साफ-सफाई आणि बंदिस्त गटारांच्या स्वच्छतेत हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अधिकारी व कंत्राटदारांना फैलावर घेतले. मॉन्सूनपूर्व साफ-सफाईच्या कामांचा आज नार्वेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून आढावा घेतला. यादरम्यान काही बंदिस्त गटारांची झाकणे उघडून स्वतः नार्वेकर यांनी पाहणी केली असता गाळ काढण्यात आला नसल्याचे निर्दशनास आल्याने ४३ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा भागात ७६ लहान, मोठे नैसर्गिक नाले असून यामध्ये एमआयडीसी क्षेत्रातील नाल्यांचाही समावेश आहे. या नाल्यांच्या सफाईची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून आत्तापर्यंत ५५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. यानुसार आधी निर्देशित केल्याप्रमाणे २५ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राजेश नार्वेकर यांनी दिले. हर्डेलिया कंपनी जवळील लक्ष्मीनगर येथील नाला सायन पनवेल हायवेखाली असलेल्या कल्व्हर्टमधून पुढे जात असल्याने या रस्त्याखालील मोठ्या कल्व्हर्टची सफाई व्यवस्थितरीत्या केली जावी, असे आयुक्तांनी निर्देशित केले.
------------------------------
काही जागांवर गटारांच्या तळाला गाळ दिसल्याने सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ४३ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच बंदिस्त गटारे सफाईप्रमाणेच नैसर्गिक नालेसफाई कामातही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.
-राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com