सर्पदंशाने शाळकरी मुलाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पदंशाने शाळकरी मुलाचा मृत्यू
सर्पदंशाने शाळकरी मुलाचा मृत्यू

सर्पदंशाने शाळकरी मुलाचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : कल्याणमधील एका पंधरावर्षीय मुलाला सर्पदंश झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमित सोनकर असे मृत मुलाचे नाव आहे. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र त्याची प्रकृती खालावल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले असता तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पालिकेने उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृत अमितच्या नातेवाईकांनी केला आहे. यावर पालिका प्रशासनाने अमितवर योग्य औषधोपचार करण्यात आले होते; परंतु त्याची प्रकृती खालावल्याने पुढील उपचार व्हावेत, यासाठी त्याला कळवा येथील अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्याचे सांगितले. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारा अमित सोनकर हा शाळेला सुट्टी असल्याने बुधवारी वडिलांच्या ज्यूस सेंटरवर गेला होता. दुपारी ३ च्या सुमारास अमितला सर्पदंश झाला. त्याला तत्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार तेथे करण्यात आले; मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील शिवाजी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना अमितचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप पालिका रुग्णालयावर केला आहे.

-----------------------
बुधवारी दुपारी अमितला सर्पदंश झाल्याने त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यूरो टॉक्सिन पॉयझन असल्याचे लक्षात आले. रुक्मिणीबाई रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागाची सुविधा नसल्याचे रुग्णास कळवा येथे हलवण्यात आले होते; मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- पुरुषोत्तम टिके, आरोग्य अधिकारी, रुक्मिणीबाई रुग्णालय