माटुंगा वर्कशॉपमध्ये मॉकड्रिल

माटुंगा वर्कशॉपमध्ये मॉकड्रिल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : रेल्वे दुर्घटना, आगीच्या घटना, पूल कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा विभागाने कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देत असते. माटुंगा कॅरेज वर्कशॉप येथे राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल आणि माटुंगा सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरीत्या यशस्वी मॉकड्रिल करण्यात आली.
या मॉकड्रिलदरम्यान विविध प्रकारच्या आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांचे बचाव आणि संरक्षण कसे केले जाते, याविषयी आपत्ती काळातील सादरीकरण टीमने दाखविले. या सर्व उपक्रमादरम्यान मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक माटुंगा यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारच्या प्रदर्शनामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना परिचित होण्यास आणि आपत्तीच्या धोक्याच्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची, हे दाखवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम योग्य नियोजन पद्धतीने पार पडला. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन माटुंगा यांच्या सर्व सदस्यांचे आभार मानले ज्यांनी सर्वांना आपत्ती परिस्थितीची ओळख करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com