देशी कट्टा, काडतुसांसह दोघांना अटक

देशी कट्टा, काडतुसांसह दोघांना अटक

भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : दोघा तरुणांकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. भिवंडीत भोईवाडा पोलिसांनी सुप्रीम हॉटेलजवळील इमारतीत राहणाऱ्या संशयित दोन तरुणांची झडती घेतली असता हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जावेद असफनदियार खान (वय ४४) आणि मोहम्मद सलामत मोशा शेख (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोईवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुगे पोलिस पथकासह बुधवारी (ता. १७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना धामणकर नाका येथील अमिना कम्पाऊंड येथील सुप्रीम हॉटेलजवळ दोघे देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर, पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुगे, योगेश कवडे, पोलिस नाईक उमेश नागरे, पोलिस शिपाई कुंभार, घुगे, विजय ताटे या पोलिस पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com