Wed, Sept 27, 2023

तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
Published on : 18 May 2023, 2:05 am
भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील कोन गावात राहून माणकोली येथील इंडियन कंपाऊंडमध्ये मजुरी करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे माणकोली गोदाम भागात आणि कोनमधील रहिवासी भागात चर्चेला उधाण आले आहे. भिवंडीतील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गोदामे असून तेथे चांगला रोजगार मिळेल, या हेतूने गोदामामध्ये कामासाठी छुप्या मार्गाने बांगलादेशी नागरिक भिवंडीत येतात. त्यांच्याकडे भारतात येण्यासाठी आणि राहण्यासाठी अधिकृत पारपत्र, व्हिसा आणि परवानाही नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. यापूर्वीदेखील पोलिसांनी अशी कारवाई करत बांगलादेशींना पकडले होते.