कोट्यवधीचे सोने तस्करी करणारा अटकेत

कोट्यवधीचे सोने तस्करी करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : कपड्यामध्ये लवपून सोन्याची तस्करी करणाऱ्या बिहारमधील नागरिकाला सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी अटक केली. या व्यक्तीकडून चार किलो २६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जमिउल्ला अहमद असे अटक केलेल्याचे नाव असून तो बिहारमधील सिवान येथील रहिवासी आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहेत. जमिउल्ला बुधवारी रात्री विमानाने दुबई येथून आला होता. संशयावरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले. त्याची झडती घेतली असता त्याने परिधान केलेली जीन्स, अंतर्वस्त्र, पायात घातलेल्या पट्टीमध्ये सोने लपवल्याचे निष्पन्न झाले. तसेच कसून तपासणी केली असता कपड्यात दडवलेल्या छोट्या पाकिटांमध्ये भुकटी स्वरूपात सोने असल्याचे उघडकीस आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com