जव्हारमध्ये १६ लाखांचा मद्यसाठा जप्त

जव्हारमध्ये १६ लाखांचा मद्यसाठा जप्त

मनोर, ता. १९ (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू निरीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (ता. १९) पहाटे जव्हार तालुक्यातील जव्हार-सिल्वासा रस्त्यावर खिरारी पाडा भागात सापळा रचून केलेल्या कारवाईत सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारमधील दमण बनावटीच्या मद्य साठ्याच्या २० बॉक्ससह तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रबोध गायकवाड (वय ४२), अजय शेजवळ (वय २६), प्रसाद आप्पासाहेब शेजवळ (वय ३२), तिघेही मु. पो. भिमनगर, ता. राहता जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आली.
पालघर जिल्ह्यालगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मद्य तस्करीवर आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथकामार्फत दिवस-रात्र गस्त घातली जात आहे. पथकाने शुक्रवारी पहाटे जव्हार सिल्वासा रस्त्यावरील खिरारी पाडा भागात एक संशयित कार थांबवून झडती घेतली असता कारमध्ये दमण बनावटीचा दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत कार चालकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाईत दमण बनावटीच्या विदेशी दारूचे २० बॉक्स आणि स्कॉर्पिओ कार मिळून सोळा लाखांचा माल जप्त करण्यात डहाणू निरीक्षक कार्यालयाच्या पथकाला यश आले आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर, डहाणू कार्यालयाचे निरीक्षक महेश प्रधनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एम. एम. मानकर, के. बी. चिंदळे, जवान के. डी. भुरकुड, पी. जे. राठोड आणि चालक एम. टी. पाडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com