पुनर्विकासासाठी ‘म्हाडा आपल्या दारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्विकासासाठी ‘म्हाडा आपल्या दारी’
पुनर्विकासासाठी ‘म्हाडा आपल्या दारी’

पुनर्विकासासाठी ‘म्हाडा आपल्या दारी’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेत अशा इमारतींच्या पुनर्विकासाला आणि स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याच अनुषंगाने म्हाडा सहकारी गृहनिर्माण संस्थेने गतिशील पुनर्विकासासाठी ‘म्हाडा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या ५६ वसाहतींत व म्हाडाच्या इतर भूखंडांवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. पुनर्विकासासाठी लागणाऱ्या सर्व बाबी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हा उपक्रम असेल. आमदार प्रवीण दरेकर आणि आशीष शेलार यांनी याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाच्या ५६ वसाहती आणि इतर वसाहतींतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय होता. आपण सभागृहात तो निर्णय स्थगित केला. लवकरच तो निर्णय रद्द करण्यात येईल. याचसोबत ५६ वसाहतींमध्ये ‘म्हाडा आपल्या दारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.