ट्रकच्या धडकेत एक मृत्यूमुखी

ट्रकच्या धडकेत एक मृत्यूमुखी

कासा, ता. १९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री बंद पडलेल्या ट्रकला मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. मोहम्मद अक्रम असे अपघातातील मृत ट्रकचालकाचे नाव आहे.
गुरुवारी रात्री वाडा येथून स्लॅब टाकण्याचे साहित्य भरून एक ट्रक गुजरातकडे चालला होता. ट्रकचालक मोहम्मद अक्रमने सोमटा हद्दीत आल्यानंतर ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. ट्रक चालक व क्लीनर अनिल यादव यांनी त्यांचा मित्र लालसाहब विश्वकर्मा मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर काही वेळातच ट्रकचा मालक कारमधून मेकॅनिकलला घेऊन आला. मेकॅनिक ट्रकच्या खाली जाऊन दुरुस्तीचे काम करत असतानाच मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने बंद पडलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकच्या हाताला गंभीर जखमा झाल्या; तर मालक शुक्ला यांनासुद्धा मार बसला. क्लीनरच्या पायाला, तसेच विश्वकर्मा लालसाब याच्यादेखील हाता-पायाला जबर मार बसला. ट्रकच्या बाजूला उभा राहून दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या चालक मोहम्मद अक्रम याच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com