वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

माणगाव, ता. १९ (बातमीदार) : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला; तर दुचाकीचालक जखमी झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या भुवन गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडला. अरुणा मुकेश शिंदे (वय ३०, रा. निळज) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. या अपघाताची फिर्याद महादेव शिंदे (वय ५४, रा. निळज ता. माणगाव) यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. अपघाताबाबत माणगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निळज येथील मुकेश शिंदे व त्यांची पत्नी अरुणा हे दोघेही दुचाकीवरून कोलाड येथे घरगुती साहित्य आणण्यासाठी गेले होते. घरी निळजला परतत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील भुवन गावच्या थांब्याजवळ त्यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अरुणा शिंदे या महिलेचा मृत्यू झाला; तर दुचाकीचालक मुकेश शिंदे गंभीर जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत.