
मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, २१ मे २०२३ रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर; तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असेल.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंड, अप-डाऊन जलद मार्ग
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड-माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर अप जलद मार्गावरून धावतील.
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल ते वाशी, अप-डाऊन मार्ग
कधी : ११.०५ ते ४.०५
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल-सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी-पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहणार आहे. पनवेल ते ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे-पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलही रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. तसेच बेलापूर-खारकोपर आणि नेरूळ-खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.