तीन गुंडांवर एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

तीन गुंडांवर एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील कासारवडवली, कळवा व उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आणि परिसरात दहशत पसरवणाऱ्या तिघा गुंडांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे येथून गुंड धीरज उर्फ विकी संतोष रेड्डी, कळवा येथून गुंड सोनू ओंमकार पवार (वय २६) आणि उल्हासनगर परिसरातून गुंड जग्गू सरदार उर्फ जगदीश तिरथसिंग लबाना (वय ४०) या तिघांची ठाणे पोलिसांनी एक वर्षाकरीता पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. आरोपी धीरज उर्फ विकी रेड्डी याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणे असे पाच गुन्हे कासारवडवली पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहेत. दुसरा आरोपी सोनू पवार याच्यावर जबरी चोरी करण्याचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापत, जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे सहा गुन्हे कळवा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तिसरी कारवाई उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड जग्गू सरदार उर्फ जगदीश लबाना याच्यावर करण्यात आली. त्याच्यावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात खंडणी, विनयभंग, धमकी देणे, असे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिघांवरही एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com