कोंडीमुळे सात किलोमीटरचा वळसा

कोंडीमुळे सात किलोमीटरचा वळसा

वाशी, ता. २० (बातमीदार)ः मुंब्रा बाह्यवळण रस्तादुरुस्तीच्या सुरू असलेल्या कामामुळे सध्या अवजड वाहनांची वाहतूक नवी मुंबईमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे दिघामार्गे पटनीवरून यू टर्न घेऊन अवजड वाहने ऐरोली दिवा गाव सर्कल मार्गे येत येतात. त्यामुळे अवजड वाहनांना जवळपास सात किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने चालक हैराण झाले आहेत.
मुंब्रा बाह्यवळण मार्गाची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात अवजड वाहने ही दुपारच्या वेळेस रबाले टी जंक्शनपासून ऐरोली पुलाकडे सोडण्यात येत आहेत; पण रबाळे टी जंक्शन जवळ ऐरोली ब्रिजकडे जाणाऱ्या मार्गावर दुपदरी रस्ता असल्यामुळे अवजड वाहनांना फेरा मारताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रबाळे टी जंक्शनपासून रबाळे स्टेशनपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
------------------------------------
पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता
रबाळे टी जंक्शन जवळ पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे दरवर्षी येथे वाहतूक कोंडी होत असते. अशातच वर्षभरापूर्वी रबाळे टी जंक्शन जवळ कल्वर्ट टाकण्याचे काम केले गेले आहे. त्यामुळे यंदा पाणी साचणार नाही, असा दावा पालिकेकडून केला जात आहे; पण पावसाळ्यातही या मार्गे अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार आहे.
---------------------------------------------
अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रबाळे टी जंक्शनपासून स्टेशनपर्यंत दररोज कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यावरील या कोंडीमुळे अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा लागतो; पण तेथेही वाहतूक कोंडी होत आहे.
- राहुल जोते, वाहनचालक
---------------------------------------
वाशीकडून ठाण्याकडे जाणारा मार्ग हा चार पदरी आहे; परंतु टी जंक्शनजवळ ऐरोली ब्रिजकडे जाताना रस्ता दोन पदरी होतो. तसेच टी जंक्शनजवळ अवघड वळणामुळे वाहनचालकांना अडचण येत आहे.
- गोपाल कोळी, वाहतूक पोलिस निरीक्षक, रबाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com