ई-सिगारेटसह तरुणाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-सिगारेटसह तरुणाला अटक
ई-सिगारेटसह तरुणाला अटक

ई-सिगारेटसह तरुणाला अटक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नेरूळ सेक्टर-६ मध्ये ई-सिगारेटची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सापळा लावून अटक केली आहे. याप्रकरणी श्रृतीक जाधवकडून (२४) १ लाख ३० हजार रुपये किमतीची ई सिगारेट जप्त करण्यात आली आहेत.
नेरूळ सेक्टर-६ मधील पामबीच मार्गालगत द वूड झोनच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती ई-सिगारेट देण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (ता. १८) सायंकाळी नेरूळ सेक्टर-६ मध्ये सापळा लावला होता. साधारण ६.३० च्या सुमारास श्रृतीक जाधव पामबीच मार्गालगतच्या सार्वजनिक रस्त्यावर उभा असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. श्रृतीक ई-सिगारेटची कोणाला विक्री करणार होता, याचा पोलिस तपास घेत आहेत. याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.