सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

सहयोगी सदस्य कोणत्या परिस्थितीत सभासदत्व गमावून बसतो?

प्रश्न ः सहयोगी सदस्य कोणत्या परिस्थितीमध्ये सभासदत्व गमावून बसतो? तसेच सहयोगी सभासदाचे नाव भागदाखल्यावर येणे आवश्यक आहे का?
- वेदवती हब्बू, मालाड, मुंबई.

उत्तर ः राज्य सहकारी कायद्यात २०१९ मध्ये पुष्कळ बदल करण्यात आले. त्यानुसार सहकार कायद्यातील कोणती कलमे सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू होतील व होणार नाहीत याची स्वतंत्र तरतूदही या बदलात आहे. तसेच कायद्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला. सोबतच सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र व्याख्या, काही शब्द, संज्ञा तयार करण्यात आल्या.
या सर्व बदलांनुसार सहयोगी सभासदास मूळ सभासदाच्या मालमत्तेमध्ये कोणताही हिस्सा मिळत नाही. केवळ सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणे, मतदान करणे, मूळ सभासदाच्या ठिकाणी त्या सभासदाचे सर्वसाधारण असे पदाचे हक्क, मतदान इत्यादी पुरते मर्यादित करण्यात आले. अशा सभासदाचे नाव मूळ सभासदासोबत भागदाखल्यावर येत नाही. तसे करण्याची आवश्यकता नाही. सहयोगी सभासद संस्थेच्या दप्तरी नोंद होतो, पण भागदाखल्यावर तशी नोंद होत नाही व त्याची नवीन बदलामुळे अशी आवश्यकताही राहिली नाही.
आता त्याचे सभासदत्व संपुष्टात येण्याबाबत चर्चा करू या. सहयोगी सभासदाचे सभासदत्व उपविधीमधील कलम ५६ अन्वये, मूळ सभासदाचे सभासदत्व समाप्त झाल्यास सहयोगी सभासद त्याचे सभासदत्व गमावून बसतो. तसेच सहयोगी सभासदाने त्याच्या खुशीने सभासदत्वाचा राजीनामा दिल्यास व तो संस्थेने स्वीकारल्यास त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. तसेच सहयोगी सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे सभासदत्व संपते.
अशा स्थितीत सहयोगी सभासदाला मालमत्तेत हक्क नसल्याने त्यासंबंधीच्या नोंदी संस्थेच्या दप्तरांमधून काढण्यात येतात. मूळ सभासद अशा स्थितीत दुसरा सभासद सहयोगी सभासद नियुक्त करू शकतो. महाराष्ट्र सहकारी कायद्यात कोणती व्यक्ती सहयोगी सभासद होऊ शकते, याविषयी नियम आणि व्याख्या आहेत. ती पाहून सहयोगी सदस्याची नियुक्ती करण्यात यावी.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेल वर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com