कल्याणमध्ये ‘द केरला स्टोरी’चा मोफत शो

कल्याणमध्ये ‘द केरला स्टोरी’चा मोफत शो

कल्याण, ता. २० (बातमीदार) : माजी आमदार नरेंद्र पवार व कल्याण विकास फाऊंडेशनच्या वतीने १८ ते २५ वयोगटातील युवतींकरिता ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला. केरळमधील अत्यंत विदारक वास्तव त्या सिनेमात दाखवण्यात आले आहे, त्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या अनुषंगाने कल्याण विकास फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांनी पुढाकार घेत हा चित्रपट दाखवला. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना व तरुणी यांना सनातनचे डॉ. उपेंद्र डहाके यांच्या माध्यमातून लव जिहाद एक षड्यंत्र हे पुस्तक वाटण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी पूर्ण चित्रपटगृह दणाणून गेले होते. यावेळी कल्याण विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी गणेश काळण, प्रवीण हेंद्रे, कल्पेश जोशी, राहुल भोईर, सदा कोकणे, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा ज्ञानेश्वर पवार, समृद्धी देशपांडे, हिंदू युवा मंचचे विवेक गायकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com