Wed, Sept 27, 2023

वीज ग्राहकांच्या जागृतीसाठी ‘संवाद’ दरबार
वीज ग्राहकांच्या जागृतीसाठी ‘संवाद’ दरबार
Published on : 20 May 2023, 9:32 am
भिवंडी, ता. २० (बातमीदार) : शहरातील नाशिक रोड आंबाडा येथे आर्श कस्टमर केअर सेंटर येथे टोरंट पॉवरने नुकताच ‘संवाद’ नावाने जनता दरबार आयोजित केला होता. या वेळी वीजग्राहकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पॉवर कंपनीचे अधिकारी अरुण राव, राघवेंद्र राव, अंकित शहा आणि विजय राणे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी ग्राहकांना मदत करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी सुमारे २५० ग्राहकांनी संवादाचा लाभ घेतल्याचे टोरंट पॉवरच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी नमूद केले. संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणद्वारे १ एप्रिल २०२३ पासून वीज दरवाढ करण्यात आली आहे. या वीजदर बदलाची लोकांना माहिती देण्याची मिळालेली संधी म्हणून कंपनीने संवाद उपक्रमाचा उपयोग केला.