गोमांस वाहतूकप्रकरणी दोघांना अटक

गोमांस वाहतूकप्रकरणी दोघांना अटक

भिवंडी, ता. २० (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर नारपोली पोलिसांनी कारमधून जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये गोमांस आढळल्याने नारपोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. झैद कुरेशी (वय १९, रा. नागपाडा, मुंबई) व मोहम्मद हुसेन (वय ३१, रा. कुरेशी नगर, कुर्ला) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून गोमांसाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मानकोली येथील रुक्मिणी ढाब्याजवळ संशयास्पद कार थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात ३०० किलो मांस आढळून आले. पोलिसांनी झैद आणि चालक मोहम्मद या दोघांना विना परवाना वाहनातून जनावरांच्या मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com