शहापूरात उभा राहिला अवैध पेट्रोलपंप

शहापूरात उभा राहिला अवैध पेट्रोलपंप

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : शहापूर नगरपंचायत हद्दीत मुख्य रस्त्यालागत कोणतीही बांधकाम परवानगी न घेता अवैध पेट्रोलपंप उभे राहिले आहे. धक्कादायक म्हणजे नगरपंचायतीने वारंवार नोटीसा बजावूनही त्याला केराची टोपली दाखवत हे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे अखेर नगरपंचायतीने पेट्रोलपंप चालक आणि जागा मालकासह चार जणांवर शहापूर पोलिस ठाण्यामध्ये एमआरटीपी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहापूर शहरातील शिवाजी चौक, राम बाग परिसरात मुख्य रस्त्यालगत सिटी सर्वे नंबर ३९४/ब मध्ये अनाधिकृतपणे पेट्रोलपंपचे बांधकाम सुरू असल्याची तक्रार ८ डिसेंबरला संजय माळी व २१ डिसेंबर रोजी शेखर अधिकारी यांनी शहापूर नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या होत्या. तसेच रमाबाई ब्रिगेड या महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांनी देखील तक्रार केली होती. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने जमीन मालक अशोक जाधव यांच्याकडे जमीन मालकी संबंधित कागदपत्र व बांधकाम परवानगीची मागणी केली होती. तसेच मालकी हक्काची कागदपत्रे सादर केल्याशिवाय पुढील पेट्रोलपंप चे बांधकाम स्थगित ठेवण्याचे पत्राद्वारे सूचित केले होते. मात्र त्यावर जुजबी खुलासा हिंदुस्थान पेट्रोलियमने सादर करित वेळ मारून नेत आपले बांधकाम बिनदिक्कत सुरूच ठेवले होते. त्यांनी दिलेला खुलासा नगरपंचायत प्रशासनाने अमान्य करीत अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे आदेश देखील दिले होते. मात्र पेट्रोलपंप चालक व मालकांनी पंपाचे बांधकाम पूर्ण करून तो पेट्रोलपंप सुरू केला. अखेर शहापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कनिष्ठ अभियंता भूषण घनवट यांनी अशोक जाधव, इंद्रजित पडवळ, हारतूदेवी चौधरी (जमीनमालक), हिंदुस्थान कार्पोरेशनतर्फे चेअरमन पुष्कर जोशी यांचे जनरल मॅनेजर पावस श्रीवस्त (भोगावटाधारक) यांच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान भर बाजारपेठेत कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता सुरू असलेला पेट्रोलपंप जो पर्यंत बंद करण्यात येत नाही तोपर्यंत आमची कायदेशीर लढाई सुरूच राहणार असल्याचे तक्रारदार ज्योती गायकवाड यांनी सांगितले.
....
पेट्रोलपंप चालक व जमीन मालक यांच्या विरोधात लेखी तक्रारी आल्यानंतर त्यांना काम बंद करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आली. तरीदेखील काम सुरूच ठेवण्यात येऊन तो पेट्रोलपंप सुरू करण्यात आला. अखेर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी कनिष्ठ अभियंता यांना प्राधिकृत करण्यात आले.
- शिवराज गायकवाड, मुख्याधिकारी, शहापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com