दिव्यांगांच्या समस्या मार्गी लावणार

दिव्यांगांच्या समस्या मार्गी लावणार

विरार, ता. २० (बातमीदार) : वसई विरार महापालिका परिसरातील दिव्यांगांच्या समस्या लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यांच्या सक्षमीकरणाबाबत महापालिकेकडून योजना राबवल्या जातात, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, तसेच दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने सुचवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार, असे आश्वासन महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अपंग कल्याणकारी संस्थेच्या शिष्टमंडळाला दिले.

दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शमीम खान यांच्यासह संस्थेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अनिलकुमार पवार यांची नुकतीच भेट घेतली. महापालिका परिसरातील दिव्यांगांच्या अडचणी आयुक्तांपुढे मांडण्यात आल्या. पालिकेच्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहचत नसल्याबाबत शिष्टमंडळाने खंत व्यक्त केली. दिव्यांगांच्या समस्यांबाबत लेखी निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले. त्यावर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून दिव्यांगांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शमीम खान, प्रहार सेवक बाबू वाल्मिकी, नीलेश देशपांडे, प्राजक्ता हनकोलकर, शाहीद सय्यद, ॲड. रितेश बनसोडे आदी उपस्थित होते. दिव्यांगांच्या विविध मागण्या मान्य करून कार्यवाहीबाबत तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

दिव्यांगांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र
आयुक्त पवार म्हणाले की, पदवीधर दिव्यांगांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले जाईल. दिव्यांगांचे असलेले स्टॉल नियमानुकुल म्हणजे महापालिकेचा परवाना, ना हरकत दाखला देण्याचे आयुक्तांनी मान्य केले. कृत्रिम अवयव निर्माण केंद्र सुरू करण्यात येईल, तसेच महापालिकेतील दिव्यांगांसाठी व्यापक धोरण तयार करण्यात येईल, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com