
समशेर खान पठाण यांचे मुंबईत निधन.
माजी पोलिस अधिकारी
समशेर खान पठाण यांचे निधन
मुंबई, ता. २० : मुंबई पोलिस दलातील माजी सहाय्यक आयुक्त समशेर खान पठाण यांचे मुंबईत निधन झाले. शुक्रवारी (ता. १९) रात्री मसिना हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
समशेर खान पठाण अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. १९९० ते २००७ दरम्यान ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. अत्यंत गतिमान कार्यपद्धतीमुळे लोकप्रिय पोलिस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अवामी विकास पार्टी नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. पठाण यांनी ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जिवंत पकडण्यात आलेला अतिरेकी अजमल कसाबचा मोबाईल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गायब केल्याचा आरोप केला होता. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली होती.